भागलपूर (Bihar):- बिहारमधील भागलपूर येथील पोलीस लाईन्समध्ये एका महिला कॉन्स्टेबलसह(Constable) पाच जणांची हत्या(Death) करण्यात आली आहे. खून करणारा दुसरा कोणी नसून महिला कॉन्स्टेबलचा पती असल्याचे निष्पन्न झाले आहे. खून(Murder) केल्यानंतर पतीने आत्महत्या केली. भागलपूरच्या इशकचक पोलीस स्टेशन (Police Station) हद्दीतील पोलीस लाईनमध्ये ही घटना घडली.
दोन मुले आणि सासू यांची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, लेडी कॉन्स्टेबल नीतू कुमारी आपल्या कुटुंबासोबत पोलीस लाईन्समधील सरकारी घरात राहत होत्या. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दूधवाल्याने नीतू कुमारी यांच्या घराचा दरवाजा ठोठावला असता बराच वेळ दरवाजा उघडला नाही. यानंतर शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा तोडला. आतील दृश्य पाहून सर्वांची तारांबळ उडाली. नीतू कुमारी, तिची दोन मुले आणि सासू यांची हत्या करण्यात आली होती. नीतू कुमारी यांच्या पतीचा मृतदेह(dead body) लटकत होता.
सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांच्या प्राथमिक तपासात नीतू कुमारीच्या पतीनेच सर्वांची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने आधी पत्नी, मुले आणि सासू-सासऱ्यांची विटेने आणि गळा चिरून हत्या केली. यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या(Suicide) केली. मरण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोटही सोडली, ज्यामध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. रेंज डीआयजी विवेकानंद, वरिष्ठ एसपी आनंद कुमार आणि अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची चौकशी केली. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.