निलंगा (Latur):- आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नामुळे मराठा समाजाच्या ४०० युवकांना उद्योजक होऊन स्वतःच्या पायावर उभा टाकण्यासाठी स्वावलंबी होण्यासाठी महामंडळाच्यावतीने कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशा उद्योजक लाभार्थ्यांचा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यावतीने निलंगा येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
प्रत्येक तरुण हा आर्थिक आणि रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा
आपला प्रत्येक तरुण हा आर्थिक आणि रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा, हेच माझ्यासह आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. आपल्या या स्वप्नांला बळ देण्यासाठी तसेच मराठा प्रवर्गातील आर्थिक मागास तरुणांना आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) पुरस्कृत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व माजी मंत्री आ, संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी तरुणांशी संवाद साधताना नरेंद्र पाटील म्हणाले, राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींच्या हाताला काम काम देऊन त्यांना उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.
जास्तीत जास्त तरुणांनी योजनाचा फायदा घ्यावा
जास्तीत जास्त तरुणांनी योजनाचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी करत विविध योजनांची माहिती दिली. तर आ. निलंगेकर म्हणाले, आपल्या निलंगा मतदारसंघातील आपले हे तरुण उद्योजक स्वतःच्या हिमतीवर नवी झेप घेत आहेत, हे पाहून आणि त्यांच्या उत्कर्षात सरकारचा प्रतिनिधी व त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करता आले. या गोष्टीमुळे मनाला प्रचंड समाधान वाटले, असे ते म्हणाले. तत्पूर्वी महामंडळाच्या आर्थिक योजनेचा लाभ घेऊन नव्याने उद्योग सुरु केलेल्या नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सचिन लांबोटे, संजय हलगरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील जाजनुरकर, सुग्रीव पाटील योजनेतील लाभार्थी नागेश पाटील, युवराज आरीकर, सचिन सूर्यवंशी, अनुराधाताई मरुरे, लक्ष्मण जाधव, भरत जाधव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.