Hingoli:- हिंगोली जिल्हयात मागील सात महिन्यात गुटखा विक्रीची पाळेमुळे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी युध्दपातळीवर मोहिम हाती घेतली असून मागील सात महिन्यात ४२ गुन्हे दाखल केले आहेत. मागील आठवड्यात दोन कारवाईमध्ये(action) २० लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या शिवाय अवैध दारु रोखण्यासाठी १२६८ ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.
गुटखा विक्री देखील सर्रासपणे सुरु असून अवैध व्यवसाय सुरु असल्याचा आरोप
हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत ग्रामीण भागातून बेकायदेशीरदारु वाहतूक (transportation) व विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. या शिवाय गुटखा विक्री देखील सर्रासपणे सुरु असून अवैध व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार अवैध व्यवसाय (illegal business) रोखण्यासाठी पोलिस विभागाने (police department) मोहिम हाती घेतली आहे. जिल्हाभरात गुटखा विक्री, अवैध रेती वाहतूक, अवैध दारू विक्रीसह अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, मारोती थोरात व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काशीकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाने मागील सात महिन्यात गुटखा विक्रीच्या ४२ केसेस केल्या असून ३० लाखा पेक्षा अधिक गुटखा जप्त केला आहे. या शिवाय ग्रामीण भागातून बेकायदा दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून १२६२ गुन्हे दाखल केले आहेत.
या शिवाय जुगार अड्ड्यांवर छापे टाकून ५४२ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच भारतीय हत्यार कायद्यांतर्गत तलवार, खंजीर बाळणाऱ्या ५३ जणांवर गुन्हे दाखल केले असून पाच ठिकाणी गावठी पिस्टल जप्त केले आहेत. एमपीडीए (MPDA)अंतर्गत १४ जणांवर हद्दपार व स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.