हिंगोली (Hingoli):- जिल्ह्यातील गुन्हेगाराची बिमोड करण्याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चंग बाधला आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात अधून मधून कोंबीग ऑपरेशन (Kombig operation)राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार २३ ऑक्टोंबरला जिल्हाभरात कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले.
एका चोरट्याकडून तलवार व रेल्वे बोगीतून चोरलेली साखर जप्त
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ ऑक्टोंबरला पहाटे ५ ते ७ दरम्यान जिल्ह्यात विशेष कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, गणेश राहिरे, मोहन भोसले, नितिन तांबे, कुंदनकुमार वाघमारे, डोंगरे, सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, राम निरगुडे, संग्राम जाधव, दशरथ आडे, विजय रामोड, गजानन बोराटे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यासह सर्व पोलीस ठाण्यामधील दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. या मोहिमेत जिल्ह्यातील ४४ ठिकाणी जेथे जिल्ह्यातील तडीपार झालेले व फरार पाहिजेत असलेले आरोपी, रेकॉडवरील सराईत गुन्हेगार, मिश्रवस्तीमध्ये तपासणी करण्यात आली आहे.
इसामाविरुध्द १८ नॉन बेलेबल वारेंट, १७ बेलेबल वारेंट एकूण ४० समन्सची बजावणी करण्यात आली
या मोहिमेमध्ये न्यायालयाकडून अनेक वेळा समन्स काढून ही न्यायालयाच्या (Courts) तारखेवर हजर राहत नव्हते. तसेच नि न्यायालकडून अटक वारेंट निघाले होते. अशा इसामाविरुध्द १८ नॉन बेलेबल वारेंट, १७ बेलेबल वारेंट एकूण ४० समन्सची बजावणी करण्यात आली. तसेच भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे तिन इसमाविरुध्द कारवाई करण्यात आली. अंधाराचा फायदा घेवुन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयित रित्याव रेकॉर्डवरील दरोडेखोर, घरफोड्या करणा सुखदेव मारोती पवार रा. खडकदवाडी जि. परभणी ह.मु. वसमत कारखाना यास ताब्यात घेतले आहे. तसेच इतर इसमाविरुध्द विविध कलमान्वये जिल्ह्यात कारवाई करण्यात येत असून वाहनाचीही तपासणी करण्यात येत आहे.