परभणी/जिंतूर (Parbhani):- शाळेच्या इमारतीसाठी नवीन जागा घेण्याकरीता संस्थेतील कर्मचार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून रक्कम घेत इमारत बांधली नाही. तसेच जुना नियुक्ती आदेशपत्र वापरुन कर्मचारी नियुक्ती करत फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात दोघांवर १२ डिसेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.
कर्मचार्यांना विश्वासात घेत त्यांच्या जवळून ४६ लाख ७० हजार रुपये घेतले
नारायण देवराव पवार यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे संस्थेचे अध्यक्ष आहे. संस्थेंतर्गत विश्वकर्मा निवासी अस्थिव्यंग विद्यालय जिंतूर येथे कार्यरत आहे. या ठिकाणी सेवेवर असलेल्या एका कला शिक्षिका व त्यांच्या पतीने फसवणुकीचा (Fraud) प्रकार केला आहे. संस्थेसाठी जागा घेऊन इमारत बांधण्याकरीता कर्मचार्यांना विश्वासात घेत त्यांच्या जवळून ४६ लाख ७० हजार रुपये घेतले. तसेच एका जवळून ६ लाख रुपये घेत त्याला संस्थेत नियुक्ती देण्याचे अमिष दाखविले. जुना स्टॅम्प वापरुन नियुक्ती आदेश देत फसवणूक केली. या प्रकरणी उत्तम गंगाधर कुंटूरकर, कल्पना नामदेव कोटरवार या दोघांवर जिंतूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.