नवी दिल्ली(New Delhi):- चौथ्या T20 मध्ये भारत आणि झिम्बाब्वेचे क्रिकेट संघ भिडणार आहेत. हरारे(Harare) येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आज विजय मिळवून टीम इंडियाला(Team India) मालिका खिशात घालायची आहे. शुभमन गिल आणि कंपनीने सलग दोन सामने जिंकून मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे मनोबल यावेळी उंचावले आहे
भारताने तिसरा T20 सामना 100 धावांनी जिंकला तर चौथ्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा(Zimbabwe) 23 धावांनी पराभव करून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे मनोबल यावेळी उंचावले आहे. कर्णधार (captain) गिलने तिसऱ्या टी-20मध्ये अर्धशतकी खेळी खेळली होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक बदल करून प्रवेश केला आहे. झिम्बाब्वेची फलंदाजी सुरू झाली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) आणि अभिषेक शर्मा मालिकेतील पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळले होते. मात्र यशस्वी जैस्वालच्या पुनरागमनामुळे अभिषेक शर्मा तिसऱ्या टी-20मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तिसऱ्या सामन्यात गिल आणि यशस्वी यांनी पॉवरप्लेमध्ये भारताला शानदार सुरुवात करून दिली. ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचा मिस्टर कंसिस्टंट होत आहे. त्याने 20 टी-20 सामन्यात 633 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 143.53 आहे.
Team India: शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद, तुषार देशपांडे.
Team Zimbabwe: वेस्ली मधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कॅप्टन), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदंडे (डब्ल्यू), रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.