आमदार संतोष बांगर यांनी केला होता पाठपुरावा
हिंगोली (Wild boar Attack) : तालुक्यातील डिग्रसवाणी येथील संतोषराव आढळकर हे १९ जानेवारीला शेतातील काम आटोपून सायंकाळी घरी निघत असताना अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला (Wild boar Attack) चढवून शरीराचे लचके तोडले होते. त्यांच्यावर हिंगोतील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली. गंभीर जमखी संतोष आढळकर यांना (Forest Department) वन विभागातर्फे तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
यासाठी आ. संतोष बांगर यांनी पाठपुरावा केल्याने २७ जानेवारी सोमवार रोजी संतोष आढळकर यांना ५ लाखाचा धनादेश आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) , वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक सचिन माने यांच्या हस्ते देण्यात आला. यानंतर आढळकर यांचे कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतर त्यांना पुन्हा अडीच लाखाचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची माहिती (Forest Department) वनविभागातर्फे देण्यात आली.