जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांची संकल्पना
हिंगोली (5 Star Hingolikar) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेवर आधारित ‘५ स्टार हिंगोलीकर’ हा उपक्रम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामधील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या (5 Star Hingolikar) उपक्रमांतर्गत नगर परिषद / नगर पंचायत यांच्या हद्दीतील सर्व घरे, शासकीय कार्यालये, शैक्षणिक आस्थापना, खाजगी आस्थापना इ. यांना कारा एकूण ङपाच निकषांच्या आधारे स्टार रेटिंग केले जाणार आहे.
जलपुनर्भरण (rain water harvesting), घराभोवती किमान पाच झाडे, घरामध्येच कचऱ्याचे विलगीकरण (waste seggregation at source), रूफ टॉप सोलर पॅनल (पीएम सूर्यघर योजना), नगर परिषदे मार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचा विहित वेळेमध्ये भरणा करणे (timely tax filling) या पाच निकषांच्या आधारे पुढील दोन महिन्यांमध्ये सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती मार्फत घरांचे सर्वेक्षण करून त्यांना स्टार रेटिंग दिली जाणार आहे. (5 Star Hingolikar) तसेच इथून पुढे होणाऱ्या नवीन बांधकामांमध्ये वरील पाच निकषांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.