कळमनुरी /हिंगोली (Hingoli):- कळमनुरी तालुक्यातील धानोरा (जं) येथील राहणाऱ्या सदानंद महादू डोंगरे वय अंदाजे ५० यांचा शेनोडी शिवारात अज्ञात आरोपीतांनी कुऱ्हाडीने(axe) घाव घालून निर्घृण खून (Atrocious murder) केल्याची घटना दि.८ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.
रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचे प्रेत
याबाबत सविस्तर माहिती अशी, की दि.८ जुलै रोजी शेनोडी मोरगव्हाण रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचे प्रेत (Dead Body) असल्याची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाली सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, सतीश ठेंगे, पोलीस जमादार गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे, अरविंद राठोड, किशोर खिल्लारे, गृहरक्षक दलाचे जवान विलास बांगर, आदींनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा सुरू केला. दरम्यान तपासात अधिक मदत व्हावी या उद्देशाने या ठिकाणी श्वानपथक व ठसे तज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात आले. यामध्ये प्रभाकर शेटे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसे तज्ञांचे(Imprint Specialists) पथकही घटनास्थळी दाखल झाले असून प्रथम दर्शनी सदानंद डोंगरे यांचा खून (Murder) कुऱ्हाडीने घाव घालून झाला असावा अशी माहिती कळमनुरी पोलिसांनी दिली असून पोलीस आरोपीचा व काही पुरावा हाती लागतोय का याचा शोध घेत आहे.