साकोली (Bhandara) :- तालुक्यातील सोनपुरी येथे दि.२६ जून रोजी पोल्ट्रीफॉर्मचा (Poultryform) ६ तास विद्युत पुरवठा (Power supply) बंद राहिल्याने अति उष्णतेमुळे ५०० कोंबड्या(Chickens) मृत्यूमुखी पडल्या. यात पोल्ट्रीफॉर्म मालकाचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले.
दिड लाखांचे नुकसान; साकोली तालुक्यातील सोनपुरी येथील प्रकार
वीज वितरण कंपनीच्या (Electricity Distribution Company) मनमर्जी कारभारामुळे व्यवसायिकाला मोठा आर्थिक (Financial) फटका बसला असून विज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावले जाईल असा निर्वाणीचा ईशारा गिरीश प्रकाश कठाणे नामक पोल्ट्रीफॉर्म मालकाने दिला आहे. सोनपुरी येथील गिरीश कठाणे या शेतकर्याने बँकेतून १२ लाखाचे कर्ज घेऊन शेतीपुरक कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry business) सुरु केला. २४ तास वीज पुरवठा सुरळीत रहावा याकरीता दोन लाख रुपये खर्च करुन वीज जनित्र बसविण्यात आले. मात्र २६ जून रोजी सकाळी ८ वाजता तांत्रिक बिघाडामुळे कुक्कुटपालनाचा विज पुरवठा जवळपास ६ तास बंद राहिला. याबाबतची माहिती महावितरणचे अभियंता अमन जिवतोडे यांना देण्यात आली.
मजुरांचा पक्षी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न तरीही अपयश
मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. गिरीष कठाणे यांनी तसेच पोल्ट्रीफॉर्म वरील मजूरांनी पक्षी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पक्ष्यांना वाचविण्यात अपयशी (failed) ठरले. परिणामी अति उष्णतेमुळे दि.२६ जून रोजी ४७२ व २७ जून रोजी पहाटे ५७ अशा ५२९ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यात सदर शेतकरी व्यवसायिकाचे जवळपास दिड लाखांचे नुकसान झाले. वीज वितरण कंपनीच्या अडेलकट्टु धोरणामुळे तसेच मनमर्जी कारभारामुळे गिरीश कठाणे नामक शेतकर्यावर मोठा आर्थिक फटका बसला. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा ग्राहक मंच न्यायालयात जाण्याचा ईशारा दिला आहे.