कळमनुरी (Hingoli):- घरगुती कारणातून एका ५५ वर्षीय व्यक्तीने कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील मसोड गावात दि.६ जुन ते दि.७जुन च्या मध्यरात्री घडली.
राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या
या बाबत सविस्तर माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील मसोड गावात राहणारे नारायण रामलाल बाहेती वय अंदाजे ५५ वर्ष यांनी घरगुती कारणातून दि.६ जुन ते दि.७ जुन च्या मध्यरात्री आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगणे, जमादार माधव भडके, संजय राठोड, माधव डोखळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा(Panchnama) केला व नारायण बाहेती यांचा मृतदेह (dead body) उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) आणला. यानंतर कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात नारायण बाहेती यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू होती.