एचएआरसी संस्थेचा उपक्रम
हिंगोली (Diwali Celebration) : मागील 14 वर्षा पासून एचआयव्ही बाधित, अनाथ व वंचित व एकल पालक बालकांची दिवाळी आनंदात जावी यासाठी एचएआरसी संस्थे तर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून वंचित मुलांना मदत केली जात आहे. यंदाही होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थे तर्फे दिवाळी दान महोत्सव 2024 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील एकल पाल्यांना आवश्यक साहित्य किट वाटप करण्यात येत आहेत. आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील 59 एकल पाल्यांसाठी (Diwali Celebration) दिवाळी दान महोत्सवाचा कार्यक्रम जि. प.प्रा.शा.थोरावा ता वसमत येथे घेण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अनाथ व निराधार मुला मुलींना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. दोन्ही तालूक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या एकल पाल्यासह पालकही उपस्थित होते. अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला छपरे तर प्रमुख पाहुणे एचआरसी संस्थेचे अध्यक्ष श्री डॉ पवन चांडक, राजेंद्र खापरे सर, संतोष रत्नपारखे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ देवरे, मुंजाजी जोगदंड,राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त गजानन चौधरी सर, नागनाथ कालुरे सर,सचिन भस्के सर, मुख्याध्यापक सारंग सर, पडोळे सर, देविदास गुंजकर सर ,श्रीमती गलांडे ताई, वाघमारे ताई आदी तालुक्यातील शिक्षक बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गजानन चौधरी यांनी केले, सुत्रसंचालन श्रीमती उषा घोडके तर आभार ज्योती चौंडे यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा लोण बु.,पार्डी खु.,पळशी,सोमठाणा ,दारेफळ या शाळेतील एकल पालक व अनाथ मुलांची निवड करून त्यांना दिवाळी किट चे वाटप करण्यात आले.
या दिवाळी किट मध्ये ५ प्रकारचे फराळ – फरसाण, शंकरपाळे, बाकरवडी, चकली, बालुशाई, मोती साबण, सुगंधी हेअर ऑइल, उटणे, टूथपेस्ट, टूथब्रश, कंगवा, ब्लॅंकेट, शेंगदाणे चिक्की, राजगिरा लाडू, पॉड्स पॉवडर, शॅम्पु, आदी साहित्य चा समावेश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी दिली. कार्यक्रमात डॉ.पवन चांडक, नागनाथ कालुरे,रत्नपारखी सर, यांनी आपले मनोगत व्यक्त करून अशा उपक्रमातून संस्थेने समाजातील गरजू व अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. (Diwali Celebration) कार्यक्रम यशस्वीतेसाठी थोरावा शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगीनी आणि विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.