दोन आरोपीना अटक, लाखांदूर पोलिसांची कार्यवाही
बारव्हा (Bike seized Case) : लाखांदूर शहरातील गृरुकृपा हॉटेल समोरून चोरी गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाचा छडा लावत लाखांदूर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. या (Bike seized Case) कार्यवाहीत १० चोरीचा दुचाकीसह अंदाजे ६ लाख ५० हजार रुपयांचे त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्तमाहिती नुसार अमझद खा नकिब खा पठाण (३९) रा. चप्राड ता. लाखांदूर यांनी गुरुकृपा हॉटेल समोर आपली दुचाकी हिरो होंडा सिडी डीलक्स एम.एच.३६/बी.यु. ७०७५ क्रमांकाची मोटारसायकल पार्क करून हॉटेलमध्ये चिकन पोहचविण्याकरिता गेले असता परत येताना मोटार सायकल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलीसात देण्यात आली. लाखांदूर पोलिसांना माहिती मिळताच तपासाची चक्रे फिरविले असता दोन संशयित आरोपींना ओळखून दि. २५ जून रोजी दोघांना अटक (Bike seized Case) करण्यात आली. यात राकेश रुपचंद रामटेके (३९) व लोकेश साहिबदास बोरकर (३०) दोन्ही रा. पुयार असे आरोपीचे नावे आहेत.
दोन्ही आरोपीची कसून चौकोशी केली असता गेल्या ५ वर्षात १० दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी पाच वर्षाच्या कालावधीत नागपूर, वडसा, अर्जुनी/मोर लाखांदूर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. ही कार्यवाही भंडारा पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलिसांनी केली आहे.