कारंजा(Washim):- ट्रॅक्टर व प्रवासी ऑटोच्या धडकेत 6 जण जखमी झाले. अपघाताची ही घटना बुधवारी 19 जून रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास कारंजा – दारव्हा मार्गावरील खान पेट्रोल पंपाजवळ(petrol pump) घडली. नारायण राठोड वय 35 वर्ष रा. सांगवी, भागुबाई बाळू शिंदे वय 55 वर्ष रा. सोमठाणा, बंडू नाना खेर वय 50 वर्ष रा. सोमठाणा, बाळू जना शिंदे वय 60 वर्ष रा. सोमठाणा, रुपेश राजाराम बलखंडे वय 34 वर्ष रा. कारंजा व शालिनी विष्णू पवार वय 36 वर्ष रा. सांगवी अशी जखमींची नावे आहेत.
जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले
सूत्रांच्या माहितीनुसार, एक प्रवासी ऑटो प्रवासी घेऊन सोमठाणा येथे जात असताना समोरून येणाऱ्या विटाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने(tractor) प्रवासी आटोला धडक (hit)दिली . त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताच्या (accidents)घटनेची माहिती मिळताच अजय घोडेस्वार व शिवम खोंड या रुग्णवाहिका चालकांनी जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु येथील उपचारादरम्यान जखमीतील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, अपघाताच्या पोलिसातील नोंदीबाबत मात्र तपशील प्राप्त झाला नाही.