परभणी (wedding ceremony) : संबोधी अकादमीच्या वतीने रविवार २६ मे रोजी आयोजित २३ व्या सर्व धर्मिय सामुहिक (wedding ceremony) विवाह सोहळ्यात ६२ जोडपे विवाहबध्द झाले. जिंतूर रोडवरील महात्मा फुले हायस्कूलच्या मैदानावर हा सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
संबोधी अकादमीच्या वतीने आयोजन
मंगल परीणय विधी भन्ते पय्याबोधी यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी भन्ते मोगलायन, भिक्खू संघ उपस्थित होते. हिंदू धर्म पध्दतीने विवाह विधी अरूणगुरू माटेगावकर, आदित्य दडके यांनी संपन्न केला. प्रमुख पाहुणे म्हणून खा.फौजिया खान, आ.डॉ.राहुल पाटील, डॉ.सिध्दार्थ भालेराव, निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, दत्ता शिंदे, मिलिंद सावंत, गौतम मुंडे, भिमप्रकाश गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रास्तावीक समाजभूषण आयोजक तथा संबोधी अकादमी अध्यक्ष भिमराव हत्तीअंबीरे यांनी केले. सामुहिक (wedding ceremony) विवाह सोहळ्यांचे आयोजन करून २ हजार २०० जोडप्यांचे विवाह लावल्याबद्दल भिमराव हत्तीअंबीरे यांचा सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
सुत्रसंचलन ममता पाटील तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जगताप, गौतम साळवे, विवाह सोहळा समिती प्रमुख , डॉ. अरविंद सावते, शेषराव जल्हारे, भीमराव पतंगे, गौतम मुंढे, सचिनराजे हत्तीअंबीरे, बाळासाहेब अंभीरे, सिद्धार्थ भराडे, डी.आर.तूपसमिंदर, बी.आर आव्हाड, दि.फ.लोंढे, उत्तम साळवे, अविनाश मालसमिंदर, नवनाथ जाधव, भगवान मानकर, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, विश्वनाथ डबडे, बंडू नरवाडे, एकनाथ खंदारे, एल.आर.कांबळे, संभाजी खिल्लारे,रोहिदास साखरे, बी. आर. आव्हाड, संतोष भराडे, मुरलीधर ढेंबरे डॉ. राजेश्वर पालमकर,डॉ. लक्ष्मन कांबळे, नवनाथ पैठणे, माधव मोते, गौतम कठाळे, राजेश चांदणे, भीमराव धबले,राजेश पंडित, संभाजी खिल्लारे, गंगाधर परसोड, धनंजय रणवीर, सोनाजी लांडगे, बाबासाहेब भूजावळे, दीपक जाधव, हेमंत घुगे, साहेबराव ढगे, अरुण पंचांगे, डॉ. नामदेव मुळे, प्रभाकर कांबळे, भीमराव श्रीखंडे, अनिरुद्ध धरपडे,सुर्यकांत उजगरे, सुरेश मगरे आदींनी परिश्रम घेतले..