आमदार रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश
लोणार (Lonar development plan) : विकास आराखड्यातील कामे गतीने पूर्ण व्हावीत यासाठी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांमुळे आता (Lonar development plan) लोणार विकास आराखड्याच्या मूळ किमतीत ६४ कोटी ८३ लाख रुपयांनी वाढ झाली असून राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे . या वेळी जिल्हाप्रमुख बळीराम जी मापारी, तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिव तेजनकर यावेळी हजर होते. आता लोणार विकास आराखड्याची एकूण रक्कम ४३४ कोटी ६१ लाख रुपये झाली आहे.
आता ४३४ कोटी ६१ लाखांचा विकास आराखडा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणार सरोवर जतन ,संवर्धन आणि (Lonar development plan) विकास आराखडा राज्य शासनाने तयार केलेला असून त्यात सांडपाणी प्रक्रिया गटार योजना, प्रयोगशाळा स्थापन करणे ,लोणार मंठा बायपास बांधकाम करणे , इजेक्टो इ ब्लॅंकेट सुरक्षित राहण्यास खाजगी जमिनीचे संपादन करणे या कामांचा समावेश होता. यापैकी इजेक्टो ई ब्लँकेट खाजगी जमिनीचे संपादन या कामावर सात कोटी १४ लाखांची तरतूद होती. ही बाब वगळून उर्वरित कामांवर ६४ कोटी ८३ लाख रुपयांच्या अतिरिक्त वाढीव रकमेस मान्यता देण्यात आली आहे. ही कामे गतीने व्हावीत यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय रायमुलकर यांनी वाढीव तरतुदीसाठी अथक प्रयत्न केले होते.
वाढीव रकमेसाठी नियोजन विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती समोर वाढीव रकमेच्या मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ५ सप्टेंबर २२४ च्या बैठकीत उच्चाधिकार समितीने शिफारस करून प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मुख्याधिकारी नगरपालिका यांच्या मार्फत होणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया भूमिगत गटार योजनेच्या रकमेत ३५ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून आता ही योजना १०६ कोटी ७० लाखांची होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणाऱ्या (Lonar development plan) लोणार मंठा रस्ता बायपास बांधकामावर पूर्वीची तीस कोटी ८० लाख तरतूद होती त्यात २५ कोटी २० लाखांची वाढ करण्यात आली असून या कामाची एकूण रक्कम ५६ कोटी इतकी मंजूर करण्यात आली आहे. नियोजन विभागाचे उपसचिव मिलिंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने ३० सप्टेंबर २०२४ रोजी याबाबतचे शासकीय परिपत्रक प्रसृत करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाबद्दल आमदार संजय रायमुलकर , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.