परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडी येथील घटना आकस्मात मृत्यूची नोंद
परभणी/गंगाखेड (Lightning Death) : शेताकडे जात असताना अचानक अंगावर वीज पडून एका ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडी शिवारात घडली. या (Lightning Death) प्रकरणी २१ मार्चला पिंपळदरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
व्यंकट कातकडे यांनी खबर दिली आहे. देविदास रामराव मुुंढे (वय ६५ वर्ष) असे मयताचे नाव आहे. कातकरवाडी शेतशिवारातुन शेताकडे जात असताना अचानक आकाशात वारा व वीज चमकुन आकाशातील वीज देविदास मुंढे यांच्या अंगावर पडली. यात त्यांचा (Lightning Death) मृत्यू झाला. पिंपळदरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ह. पायघन करत आहेत.
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
पूर्णा : शौचास गेलेल्या एकाचा रेल्वेची धडक लागुन मृत्यू झाला. ही (Lightning Death) घटना पूर्णा शहरातील अली नगर भागात घडली. या प्रकरणी २१ मार्चला आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मलप्पा चव्हाण यांनी खबर दिली आहे. रामलिंग गुरप्पा चव्हाण (वय ४५ वर्ष) असे मयताचे नाव आहे. तपास पो.ह. राठोड करत आहेत.
बसस्थानकासमोर आढळला मृतदेह
परभणी : नोकरीसाठी सिंधुदुर्गला निघालेल्या एका इसमाची अचानक प्रकृती खालावुन त्यांचा मृत्यू झाला. ही (Lightning Death) घटना परभणी शहरातील बसस्थानकासमोर २१ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली. विलास राठोड यांनी खबर दिली आहे. विनोद किशन चव्हाण (वय ५७ वर्ष) असे मयताचे नाव आहे. कोतवाली पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ह. निळेकर करत आहेत.