मंगरूळपीर (Washim) :- तालुक्यातील मौजे शेलुबाजार ते महान रस्त्यावर एका वाहनात आठ जनावरे कोंबून नेत असल्या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी एका अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून जनावराची सुटका केली आहे. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश रामदास सावळकर वय 34 राहणार गणेश पेठ वाशिम बजरंग दल संयोजक वाशिम जिल्हा यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास महान शेलुबाजार वरून वाशिमला जात असताना पिकप वाहन क्रमांक २७ बी एक्स 8424 या वाहनातून अवैद्यरित्या सहा बैल दोन गोरे असे एकूण आठ गोवंश त्यांना त्रास होईल असे आखूड दोरीने बांधून निर्दयपणे व क्रूरपणे वाहतूक करून असताना आढळून आल्याने पोलिसांना माहिती मिळताच आरोपी फरार झाला आहे. सदरचे कायदेशीर तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे प्राणी संरक्षण नियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वय आरोपी विरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पो.हे.का.चव्हाण मेजर करीत आहे.
Washim : मंगरूळपीर येथे 8 गोवंशाची सुटका; अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
You Might Also Like
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics


