चंद्रपूर(Chandrapur):- फिर्यादी नामे खुर्शीदा बानु रहीम शेख रा. पागलबाबानगर यांनी ८ मे २४ रोजी रामनगर येथे दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून ८ मोटार सायकलसह घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिणे असा एकून १ लाख २ हजाराचा मुद्देमालासहित आरोपीस अटक केली.
दुचाकी विकण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती
निखील अनिल मैकलवार वय २४ वर्ष, रा. बल्लारशा असे आरोपीचे नाव आहे. खुर्शीदा शेख या लग्न कार्यासाठी कुटूंबासोबत गेल्या असता त्यांच्या घरामागील दरवाज्याचे कुलूप (lock) तोडून चोरट्याने घरातील सोन्याचे नेक्लेस, टाप्स, मंगळसुत्र, मणी व डोरले, अंगठी, चांदीचे चाळ व एम.एच. ३४ बि.ई. ९३६५ क्रमांकाची दुचाकी (Two Wheeler)चोरून नेल्याचे आढळून आले. त्यामुळे शेख यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भादवीचा गुन्हा केनस होता. सदर आरोपी हा जुनोना चौक बाबुपेठ परीसरात एक जुनी वापरती पॅशन प्रो(Passion Pro) एम.एच. ३४ बि.ई. ९३६५ या क्रमांकाची दुचाकी विकण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती(confidential information) पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीस विचारपूस
यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीस विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीकडून टिव्हीएस ज्युपीटर (TVS Jupiter)मोपेड एम.एच.३४ बि.डब्लु. १३०१, होडा अॅक्टीवा मोपेड गाडी क.एम.एच. ३४ ए.एन.१२०९, होडा अॅक्टीवा मोपेड गाडी क. एम.एच. ३४ बि.के. ६४२७, हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा एम.एच. ३४ बि.सी ०७४८, टिव्हीएस ज्युपीटर मोपेड गाडी क. एम.एच. ३४ सि.ए. ८१२० अशा एकून ८ मोटार सायकल(motor cycle) व घरफोडीचे गुन्हयातील सोने चांदी जप्त करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पो.नि. यशवंत कदम, तसेच गुन्हे शोध पथक रामनगरचे सपोनी देवाजी नरोटे, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, प्रशांत शेंदरे, आनंद खरात, लालु यादव, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, विकास जुमनाके, विकास जाधव, पंकज ठोंबरें, मनिषा मोरे यांनी केली.