Budget 2024 for farmers:- अलीकडेच, अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान, कृषी तज्ञांनी अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. वृत्तानुसार, त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम सध्याच्या 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये वार्षिक करण्याची विनंती अर्थमंत्र्यांना केली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे थेट शेतकऱ्यांना सर्व अनुदान देण्याबरोबरच, त्यांनी अर्थसंकल्प 2024 मध्ये कृषी संशोधनासाठी (Agricultural Research) अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.
पीएम किसान सन्मान निधी
24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी(Financial aid) पीएम किसान योजना सुरू केली. या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात. देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिकचे पेमेंट मिळाले आहे.
पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला निर्णय
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना भेटवस्तू दिली आणि त्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली. पीएम किसानच्या 17 व्या हप्त्याद्वारे, 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि अंदाजे 20,000 कोटी रुपये वितरित केले गेले.
eKYC अनिवार्य
पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा शेतकरी बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधू शकतात. तुम्हाला पीएम किसान हप्त्याचे पैसे न मिळाल्यास, तुम्ही pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता.