परभणी/सेलू (Parbhani) :- शहरात सेलू-वालुर रस्त्यावर असलेल्या दादुपंथी गोशाळेच्या परिसरात एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचे प्रेत आढळून आले आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबतची पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू -वालूर रस्त्यावर असलेल्या दादुपंथी गोशाळेच्या परिसरात काटेरी झुडपात सरस्वती सज्जनराव भांबळे वय ८० वर्षे राहणार गायत्री नगर सेलू या वृद्ध महिलेचा मृतदेह (Dead body)आढळून आला.
गोशाळेच्या परिसरात काटेरी झुडपात आढळला महिलेचा मृतदेह
याबाबतची माहिती रामेश्वर काशिनाथ शिंदे यांनी सेलू पोलीसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस हवलदार के. एस. तेलंगे यांनी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी (Autopsy) उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मयत वृद्ध महिला सरस्वती भांबळे यांची ओळख पटली असून शहरातील गायत्री नगर म्हणजेच घटनास्थळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर राहते. आजारपण आणि वृद्धात्वातून तिचे निधन झाले असावे. या महिलेच्या नातेवाईक बाहेरगावी राहत असलेल्या मुलीने संमती दिल्यामुळे नगरपालिकेच्या वतीने तिच्यावर गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के. एस. तेलंगे हे पुढील तपास करत आहेत.