कळमनुरी (Kalmanuri Nagar Palika) : ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यावर हरकती, सूचना स्विकारण्याचे काम सोमवारी १३ ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण होणार होते. यामुळे ८ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर पर्यंत नगर परिषदेमध्ये शहरातील १० प्रभागातील ८२४ नागरिकांनी आपले नाव इतर प्रभागात गेले आहे. तसेच काही प्रभागात मतदारांची संख्या ही नियमापेक्षा जास्त झाली आहे.
या आशयाचे आक्षेप दाखल केले होते. याक्षेपाची चौकशी व पंचनामे करण्यासाठी नगर परिषद प्रशासनातर्फे तीन पथकाची नेमणूक करण्यात आली होती त्या अनुषंगाने या पथकाचा अहवाल पाहून नगर परिषदेमध्ये आलेल्या नागरिकांच्या आक्षेपावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी कळमनुरी यांना प्राधिकृत केले आहे.
३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार अंतिम यादी (Kalmanuri Nagar Palika) निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यावर हरकती, सूचना स्वीकारण्याचे काम सोमवारी १३ ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण होणार होते मात्र मुदतवाढ मिळाल्याने. या हरकती आणि सूचनांनुसार दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. १७ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ आहे. ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील.
नगर निवडणुकीसाठी (Kalmanuri Nagar Palika) तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगली दमछाक झाली आहे सोमवारी १३ ऑक्टोबर दिवसापर्यंत या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी शेवटची तारीख होती मात्र आता मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी १७ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी कळमनुरी नगर परिषदेत गर्दी झाली. होती. निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी सोमवार १३ ऑक्टोबरपर्यंतची पर्यंतची मुदत देण्यात आली होतीः मात्र, प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. त्यामुळे आता १७ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरातील काही ठिकाणी मतदारांची नावे गायब झाली आहेत. काही नावे दुसर्या वॉर्डाच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे याद्या पाहून इच्छुक व विद्यमान नगरसेवकांनी डोक्याला हात मारून घेतला. पहिल्या दिवसापासून या याद्यांवर आक्षेप नोंदविण्यास सुरवात झाली होती.
