Gondia:- अनेक व्यक्ती आपला वाढदिवस अनेक पद्धतीने साजरा करतात परंतु देवरी येथील ग्रंथ मित्र एडवोकेट डॉक्टर श्रावण उके यांनी आपला वाढदिवस त्यांच्या वयाची जीतकी वर्षे पूर्ण होतात तितके ग्रंथ देवरी स्थित विद्यालय व महाविद्यालयातील वाचनालयातील वाचनालयास विद्यार्थ्यांच्या (Students)वाचनाकरता ग्रंथ भेट देतात.
वकील संघ देवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ भेट सोहळा साजरा
दिनांक 28 /8 /2024 रोजी त्यांच्या वयाचे 84 व्या वाढदिवसानिमित्त (Birthday)84 ग्रंथ मनोहर भाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील वाचनालयात संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्या मार्फत ८४ ग्रंथ भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय देवरी येथे प्राचार्य माननीय जी एम मेश्राम मनोहर्भाई पटेल हायस्कूल देवरी यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय गिरधर सिंगणजुडे सहाय्यक गटविकास अधिकारी प स देवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच एडवोकेट प्रशांत संगीडवर अध्यक्ष देवरी वकील संघ, एडवोकेट सचिन बावरिया कोसाध्यक्ष देवरी वकील संघ, माननीय राधेश्यामजी बगडिया माजी सभापती, माननीय विष्णुजी गोयल उद्योगपती देवरी, माननीय प्रवीण डांगे ठाणेदार देवरी, माननीय एडवोकेट गंगभोईर सचिव तालुका वकील संघ देवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ भेट सोहळा साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता आयुष्यमान शारदा उके यांनी अथक परिश्रम घेतले
सर्वप्रथम संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून वंदन करण्यात आले त्यानंतर मंचावरील पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व परिचय करण्यात आला. मंचावरील सर्व पुस्तकांनी 84 ग्रंथ प्राचार्य जी एम मेश्राम यांना भेट देण्यात आले त्यानंतर सुरेंद्र काणेकर यांनी ग्रंथ मित्र एड . डॉ. श्रावण उके यांचा परिचय करून देण्यात आला त्यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रस्तुत उपक्रम प्रेरणादायी व विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करणारे आहे व विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमातून बोध घ्यावा असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट रेखा भाजीपाले यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन माननीय अंबुले सर यांनी पार पाडले असून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता आयुष्यमान शारदा उके यांनी अथक परिश्रम घेतले.