दोन वर्षाच्या थकीत एफआरपीने अडचणीत सापडला होता टोकाई
परभणी/जिंतूर (Farmers FRP deposit) : वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखान्याची गत दोन वर्षापासून तब्बल नऊ कोटीच्या वर शेतकर्यांची एफआरपी देणे बाकी असल्याने हा साखर कारखाना डबघाईस आला होता परंतु श्री तुळजाभवानी साखर कारखान्याच्या चेअरमन भावना मुंगसे – बोर्डीकर यांनी पुढाकार घेत शेतकर्यांची बाकी असलेली ९ कोटी १लाख ६९ हजार ९६४ रु जमा केल्याने शेतकर्यांची चिंता मिटली आहे.
राज्य शासनाच्या परवानगीने श्री तुळजाभवानी साखर कारखाना वसमत तालुक्यातील (Farmers FRP deposit) टोकाई साखर कारखाना यांच्यातील सहयोगी करार झाला असून इथूनच टोकाईची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली कारखान्याचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांची गत दोन वर्षापासून या टोकाई कारखान्याने एफ आर पी देणे बाकी होते.
परिणामी शेतकर्यांनी टोकाई (Farmers FRP deposit) कारखाना बंदही पाडला. परंतु श्री तुळजाभवानी साखर कारखाना व टोकाई यांच्यातील सहयोगी करार होताच शेतकर्याच्या खात्यात गळीत हंगाम २०२२-२३ चा दोन वर्षाचा बाकी एफ आर पी तब्बल नऊ कोटी एक लाख ६९ हजार ९६४ भावना बोर्डीकर यांनी जमा केल्याने शेतकरी सुखावला आहे तसेच काही साखर कारखान्याच्या कर्मचार्यांची थकीत रक्कम सुद्धा मोठ्या प्रमाणात अदा करण्यात आली असून या कारखान्याचा कर्मचारी वर्ग, ऊस उत्पादक, शेतकरी आनंदला आहे.
ज्याप्रमाणे माझा पहिला श्री तुळजाभवानी साखर कारखाना यशस्वीपणे वाटचाल करत आहे तेथील सर्व कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, तांत्रिक कर्मचारी, वाहतूकदारा सह कारखान्याच्या विविध विभागातील सर्व घटकांची मी स्वतःच्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे काळजी घेत आलेली आहे, तशीच काळजी मी टोकाईचे प्रगतीसाठी घेईन, अशी ग्वाही भावना मुंगसे बोर्डीकर यांनी दिली.