पुसद (Pusad):- नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकी(Lok Sabha Elections) बाबत येथील राजकीय विश्लेषक तथा समाजसेवक शिलानंद कांबळे यांनी दीड महिन्यापूर्वी देश व राज्य पातळीवर केलेल्या सर्वेक्षणमध्ये चार जूनच्या निकालात 99% अंदाज खरे ठरले.
29 ते 31 इतक्या जागा महाविकास आघाडी तर एखादी जागा अपक्ष येऊ शकते
त्यांनी बीजेपी (BJP)महाराष्ट्र राज्यात आठ ते दहा जागेवर विजय होईल, अजित दादा पवार च्या पक्षात एक जागा तर काही जागेवर शिंदे गट तसेच 29 ते 31 इतक्या जागा महाविकास आघाडी तर एखादी जागा अपक्ष येऊ शकते. असा शिलानंद कांबळे यांनी राजकीय अंदाज सांगितला होता. देशपातळीवर सुद्धा बीजेपी जास्तीत जास्त 235 ते 245 पर्यंतच जागा मिळवेल, हिंगोली मधून निवडून आलेले खासदार नागेश पाटील यांनाही त्यांच्या घरी जाऊन आपली राजकीय विश्लेषणाची(Political analysis) माहिती दिलेली होती. यवतमाळ मतदार संघातून विजय झालेले खासदार संजय देशमुख यांच्यासमोर देखील दुधागिरी तांडा येथे जाहीर भाषणात महाविकास आघाडी बद्दल व राजकीय विश्लेषक म्हणून शिलानंद कांबळे यांनी विजयाची खात्री दिली होती. एखाद्या निष्णात राजकीय विश्लेषकाला जमणार नाही इतके तंतोतंत राजकीय अंदाज शिलानंद कांबळे यांनी व्यक्त केले हॊते.