परभणी(Parbhani) :- शहरासह जिल्ह्यात हिवतापाचा (winter heat) धोका वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्हा हिवताप विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. परभणी शहरातील त्रिमुर्ती नगरात वास्तव्यास असलेल्या एका ३४ वर्षीय तरूणाचा खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान डेंग्यूने (Dengue) मृत्यू झाला आहे.
डेंग्यूने ३४ वर्षीय तरूणाचा परभणीत मृत्यू
निखिल नरसिंगराव अनदूरे वय ३४ वर्ष असे मृत तरूणाचे नाव आहे. डेंग्यूची लक्षणे दिसत असल्याने सदर तरूणाला परभणी येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू (Death)झाला. मागील काही दिवसात परभणी जिल्ह्यासह शहरात डेंग्यू, मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढल्याचे दिसत आहे. डासांचा कमी करण्याकडे संबंधित जिल्हा हिवताप यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या अगोदरही परभणी शहरात एका तरूणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.