रिसोड (Washim):- पेनगंगा नदी पात्रात बुडून एका 35 वर्षी व्यक्तीचा मृत्यू(Death) झाल्याची घटना दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 वाजता रिसोड तालुक्यातील बाळखेड येथे उघडकीस आली.
पैनगंगा नदीपात्रामध्ये आढळला मृतदेह
राजू भास्कर जाधव वय 35 वर्षे असे मृतकाचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार राजू भास्कर जाधव हा दुपारी 3 वा.दरम्यान शेतात कामानिमित्त गेला होता. मात्र तो रात्री उशीर होऊनही परत आला नाही यामुळे त्याचा शोध घेण्यात आला. बाळखेड येथील पैनगंगा नदीपात्रामध्ये त्याचा मृतदेह (Dead- Body) आढळून आला. घटनेची माहिती रिसोड पोलिसांना देण्यात आली.राजू जाधव याचा मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवाविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आला. या प्रकरणी रिसोड पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.