कारंजा(Washim):- तालुक्यातील इंझा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा साप (snake) चावल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी झिरो एफआयआर (FIR) अंतर्गत येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये (Police station)२९ जून रोजी मर्ग दाखल करण्यात आला आहे.
कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सारंग जगन्नाथ सोळंके (४५ रा. इंझा) यांना १६ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास इंझा शेतशिवारात सर्पदंश (snakebite) झाला. त्यांना उपचाराकरीता नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) अकोला येथे भरती केले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू(death) झाला. याप्रकरणी डॉ. जयराजसिंग यादवतर्फे वॉर्डबाँय कालीदास कुलकर्णी रा.वार्ड नं.२९ शा.वै.म.वि.अकोला(Akola) तर्फे हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण तर्फे हेड कॉन्स्टेबल कोहर यांच्या फिर्यादीवरून १७४ जा. फौ. नुसार मर्ग दाखल करण्यात आला आहे.