परभणी/चारठाणा(Parbhani):- येथील पोलीस ठाणे हद्दीतील परभणी ते छ.संभाजीनगर महामार्ग रोड लगतच नांदगाव शिवारातील घोडके कंन्स्ट्रक्शन या ठिकाणी रोडच्या कामासाठी आलेले कामगार बाबाराव राघोजी घुगे वय ५२ वर्ष व्यवसाय ड्रायव्हर, (रा.हिंगणी त्ता.जि.हिंगोली) ह.मु. घोडके कंन्स्ट्रक्शन, नांदगाव शिवार येथील कामावर होते. ते काही कामानिमित्त बाहेर गेले आसता याची पत्नी कुसूम बाबाराव घुगे वय ४७ वर्ष,(रा. हिंगणी ता.जि.हिंगोली) ह.मु. घोडके कंन्स्ट्रक्शन, नांदगाव शिवार ता.सेलू, याची शोधाशोध करीत असताना आर. बी. घोडके कन्स्ट्रक्शन, जवळील बुध्द विहारा परिसरातील तळयातील विहीरीत ही महीला शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:२५ च्या सुमारास विहीरीमध्ये मृत अवस्थेत आढळून आली. तीने आत्महत्या (suicide) केली असे दिसून आले.
चारठाणा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
ह्या सदरील घटनेची माहीती चारठाणा पोलीस ठाण्यात (Police station)मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.एन.थोरवे, गुप्तचर विभाग ऊमेश बारहाते, यांच्यासह आदी पोलीस कर्मचार्यांसह होमगार्ड यांनी घटनास्थळी भेट देऊन शव विहीरीतुन वर काढून सदरील घटनेचा पंचनामा करून शव शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करुन शव कुटुबीयाच्या स्वाधीन करण्यात आले. मयताचे पती बाबाराव राघोजी घुगे यांच्या जबावावरुन चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्हा दाखल करून पुढील तपास पो.ऊपनि एस.एन. थोरवे कडे देण्यात आला आहे.