रिसोड (Washim):- लक्झरीच्या धडकेत एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रिसोड वाशिम मार्गावर ग्राम वनोजा जवळ घडली.
लक्झरी चालकाच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल
धर्माबाई मरग्या शेळके वय 70 वर्ष राहणार चिखली तालुका रिसोड जिल्हा वाशिम असे मृतक वृद्ध महिलेचे नाव असून याप्रकरणी रिसोड पोलिसांनी लक्झरी चालकाच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नारायण निंबाजी मासुळकर राहणार चिखली यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची आत्या धर्माबाई मरग्या शेळके ही आसेगाव वरून चिखलीकडे पायदळ येत होती.या दरम्यान ग्राम वनोजा जवळ भारधाव वेगाने निष्काळजीपणने लक्झरी क्रमांक एम एच 46 ए एच 5445 च्या चालकाने तिचि आत्या धर्माबाइला जबर धडक दिली.
लक्झरीस रिसोड येथे पोलीस स्टेशन मध्ये जमा
सदर घटनेची माहिती रिसोड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत मृतदेह (dead body) शवविच्छेदनासाठी (Autopsy) रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व तसेच सदर लक्झरीस रिसोड येथे पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी लक्झरी चालकाच्या विरोधात कलम 106 281 184 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांचे मार्गदर्शनात बीट जमादार मंगेश मालवे हे करीत आहेत