अनिल फेपाळे- अध्यक्ष, अस्तिक वारे- कार्याध्यक्ष, श्याम सावळे- उपाध्यक्ष
बुलढाणा (Sarpanch Parishad) : अखिल भारतीय सरपंच परिषदेची (Sarpanch Parishad) जिल्हा कार्यकारी गठित करण्यासाठी बुलढाणा येथे आराध्या लॉन्स याठिकाणी आज मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी बैठक संपन्न झाली, त्यात अध्यक्षपदी अनिल फेपाळे, कार्याध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष म्हणून अस्तिक वारे ते श्याम सावळे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीला अखिल भारतीय सरपंच परिषदेचे (Sarpanch Parishad) संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावखेड्याचा कारभार चालवत असताना येणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सरपंच हा महत्त्वाचा घटक असून त्यांची एकजूट असणे आवश्यक आहे. म्हणूनच या बैठकीमध्ये सर्वांनुमते कार्यकारणी गठित करण्याचे ठरवले गेले. सदर कार्यकारणी मध्ये रूईखेड मायंबा सरपंच अनिल फेपाळे यांना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तसेच अस्तिक वारे देवपूर सरपंच यांना जिल्हा कार्याध्यक्ष तर श्याम सावळे जिल्हा उपाध्यक्ष डोंगरखंडाळा उपसरपंच यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जयंत पाटील यांच्या सरपंचांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंतच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच पंधरा लाख रुपयापर्यंत विकास कामे करण्याचा ग्रामपंचायतचा अधिकार पूर्ववत मिळवणे आणि (Sarpanch Parishad) सरपंच उपसरपंचांचे मानधन दुप्पट होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले ग्रामीण महाराष्ट्र गावखेडी आणि ग्रामस्थांसाठी सरपंचांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केल्यास विकास सहज शक्य आहे. सरपंच झाल्यानंतर गावच्या विकासाला प्राधान्य देऊन प्रत्येक गावकरी समान समजून काम केल्यास मोठे परिवर्तन घडते. (Sarpanch Parishad) सरपंचांनी ग्रामपंचायत चालवण्याबरोबरच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकरी गट, फार्मर प्रोडूसर कंपन्या स्थापन करण्याचे आवाहन केले, ज्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल.
त्याचप्रमाणे आपल्या गावातील प्राथमिक शिक्षण, आरोग्य, स्वच्छता याबाबत विशेष लक्ष देऊन गावचा विकास साधावा असे आवाहन केले.
भविष्यकाळात सरकारकडून सरपंच उपसरपंच यांना विमा संरक्षण त्याचप्रमाणे पेन्शन लागू करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्याचा संकल्प केला, तसेच गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत शासनाच्या असणाऱ्या सर्व कमिट्यांमध्ये सरपंच प्रतिनिधी असावाच ही मागणी लावून धरण्यात येईल. परंतु त्यासाठी सरपंचांची एकजूट अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या (Sarpanch Parishad) जिल्हा कार्यकारणी गठीत केलेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार सन्मान करण्यात आले.
या (Sarpanch Parishad) कार्यक्रमासाठी येळगावचे सरपंच दादा लवकर तसेच सतीश पाटील, संजय काळवाघे, नागेश पाटील, गजानन वतपाव, मधुकर महाले, प्रल्हाद सुलताने, पवनकुमार वाघ, गजानन भोलाणे, प्रदीप तिकडे, गजानन मिरची, शारदा म्हणे, विष्णू खैंबटकर, जगन्नाथ वाघ, विष्णू शेळके, योगिनी भागवत पवार, छाया अंभोरे, संजय पाटील, डॉ. विजय तेजनकर, रामेश्वर बुधवत, भगवान रिंढे, भिकनराव भुतेकर, रामभाऊ जाधव, जनार्धनआप्पा सूसर, अजय गायकवाड, विलास महाराज शेळके, सचिन खेडेकर विनोद कणखर, अर्जुन दांडगे प्रदीप सोळंकी, चेतन मस्के सत्यभामाताई बोर्डे, प्रज्ञाताई गुलाबराव कांबळे, हर्षल आडवे, संजय उबरहंडे, राधाताई निलेश देठे, पंडितभाऊ हिवाळे, डॉक्टर खान, संजय मोरे, अंजना केदारे, राजाराम पिंपळे, संजय शिंदे, संदीप सानप, राजू वाघ, गणेश भोंडे, जीवन तायडे, प्रशांत गाढे इतरानीं मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.लवकरच प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा पदाधिकारी दौरा करून तालुकाध्यक्ष व कार्यकारणीच्या नेमणूक करण्यात येतील, असे या ठिकाणी जाहीर करण्यात आले.