गंगाखेड(Gangakhed):- दोन गटात झालेल्या भांडणात(quarrel) दुचाकी पेटवून दिल्याची घटना दिनांक २८ एप्रिल रविवार सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास पालम रस्त्यावर दत्त मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शहरातील पालम रस्त्यावर दत्त मंदिर परिसरात दोन गटात झालेल्या भांडणात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. रस्त्यावर दुचाकी जळत असल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस शिपाई अनंत डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेत.
नगर परिषदेचे(City Council) मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना संपर्क साधला असता त्यांनी अग्निशामक दलाचे रामविलास खंडेलवाल, श्रीकांत साळवे, आकाश लव्हाळे, शाम जगतकर, सुरज खंडेलवाल आदींना घटनास्थळी पाठविले असता त्यांनी आग लागलेल्या दुचाकीची आग(fire) विझवून दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली. या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भांडणं कोणत्या कारणावरून झाले होते हे मात्र समजू शकले नाही.