Chandrapur:- चंद्रपूर वरून निघालेली चंद्रपूर ते आदिलाबाद महाराष्ट्र राज्य परीवहन (Maharashtra State Transport)मंडळाची एस टी क्र. एम एच ४०, ९९८२ ही एस टी चंद्रपूर वरून अंदाजे ८ ते ८. ३० ला प्रवाशी घेऊन निघाली.
भंगार अवस्थेत असलेली बस फेल झाल्यामुळे अचानक बंद
मात्र कोरपना तालुक्यातील देवघट नाल्याजवळ भंगार अवस्थेत असलेली बस फेल(Bus failed) झाल्यामुळे अचानक बंद पडली. ९. ३० वाजता पासून प्रवाशी महिला व पुरुष उन्हात तातकळत रोड वर दुसऱ्या बस ची प्रतीक्षा करीत होते प्रवाशी्यांचे मत जाणून घेतल्यास त्यात कुणाचे आदिलाबाद येथून ट्रेनचे रिजर्वेशन (Reservation of trains)होते, तर कुणाला लग्नाला पोहचण्याची घाई तर कुणाला दवाखण्यात जाण्याची घाई, तर कुणाला ऑफिस ला वेळात पोहचण्याची घाई. मात्र या प्रवश्याची तिकीट आधीच काढून असल्याने तेलंगाणा (Telangana) च्या बस मध्ये त्यांना त्याच तिकिटावर जाता येत नव्हते वाहतूक परिवाहन मंडळाच्या वाहतूक निरीक्षकाला संपर्क करुन त्याठिकाणी बोलावून दुसऱ्या बस ची सोय करण्यास सांगितले मागील दोन तासापासून थांबून असलेले प्रवाशी अखेर सुखरूप प्रवासात निघाले.
महाराष्ट्र शासन एकीकडे महिलांना अर्धे तिकीट देत आहेत तर ग्रामीण भागात चांगल्या रस्त्याअभावी एसटी ची अवस्था भंगार होत आहे त्यामुळे प्रवास्यांना मणक्याच्या, पाट्याच्या अशा अनेक आजाराला सामोरे जावे लागत आहे. भंगार (scrap) बसेस मुळे रस्त्यावर पाण्याभावी तातकाळात राहावे लागत असल्याने हीच का साहेब अर्धे तिकीट ची सुविधा असा प्रश्न या नीमित्ताने महिला वर्ग विचारत आहे.