हिमायतनगर (Himayatnagar):- हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा – करंजी येथील रहिवासी विठ्ठल नारायण जाधव यांच्या शेतातील म्हैशीवर वीज (Electricity) पडून म्हैस दगावल्याची घटना १३ में रोजी मध्यरात्री घडली.
शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून सदर म्हैस दररोज पाच लिटर दूध देत असल्याची माहिती
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे दिनांक १३ में रोजी सोमवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन करंजी येथील शेतकरी विठ्ठल जाधव यांच्या कट क्रमांक 27 मधील शेतात बांधलेली एका म्हैशीवर मध्यरात्री वीज पडल्याने एक म्हैस जागीचं दगावली. सदर घटना समजताच करंजी येथील सरपंच, उपसरपंच, नासर पठाण यांनी कळविल्याने दुधड सज्जाचे तलाठी शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा (panchnama) केला आहे.यामध्ये सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून सदर म्हैस दररोज पाच लिटर दूध देत असल्याची माहिती प्राप्त झाली.