वरोरा(Warora):- मौजा वाघनख येथील शेतकरी शेषराव घनश्याम कलवडे यांची शेती मौजा खरवड शेतशिवारात असून त्या शेतातील विहिरीलगत आसलेल्या गोठ्याला दि.२६ रोजी अचानक आग लागल्याने गोठ्यातील बांधून असलेले दोन बैल(bull) आगीत होरपळले त्यात एका बैलाचा मृत्यु (Death) झाला तर एक बैलाने आपल्या जोरावर दोरखंड तोडून पळून गेल्यामुळे तो वाचला मात्र जखमी आहे. .
आग इलेक्ट्रिकच्या तारातील स्पार्किंगने लागली असल्याचे प्राथमिक अंदाज
दुसरा बैल गंभीर जखमी झाला व दुसर्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. तसेच वखर, लाकूड साहित्य, ओलित पाईप तसेच शेतीचे बरेच साहित्य आगीत भस्मसात(consumed) झाले असून जनावराचा चारा सुद्धा जळाला आहे. सदर शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तलाठी यांनी केलेल्या पंचनामातून शासनाला अहवाल पाठविला आहे. सदर आग इलेक्ट्रिकच्या (Electric) तारातील स्पार्किंगने लागली असल्याचे प्राथमिक अंदाजातून माहित मिळते. शासनाने सदर शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकर्यांनी केलेली आहेत.