पातूर(Akola) :- बाळापूर-पातूर रस्त्यावरील वाडेगाव टी-पॉईंटजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू (Death) झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला.
दुचाकीस्वार युवकाचा जागेवर मृत्यू
पातूर येथील शेख शफीक शेख नजाकत (२५), तर शेख तस्लिम शेख रहीम (अंदाजे २०) ‘दोघे दुचाकी क्रमांक एम. एच. ३० बीपी ७०८५ ने बटवाडीवरून पातूरकडे जात होते. त्यावेळी मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर (Accident) रंजित अहिर, शंकर वाघ आणि विनोद सरप यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने मदत केली आणि अकोला येथे उपचारासाठी पाठवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शोएब व रुग्णचालक मंगेश जंजाळ हे जखमींना रुग्णवाहिकेने(Ambulance) उपचारासाठी अकोला येथे घेऊन जात असताना शेख शफी याचा मृत्यू झाला. बाळापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. सलग दुसऱ्या दिवशी दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.