परभणी/चारठाणा (Parbhani):- पोलीस ठाणे हद्दीतील रायखेडा शिवारात तिर्रट नावाचा जुगार (Gambling) सुरू असल्याची माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. या कारवाईत १० जुगारऱ्याना ताब्यात घेऊन रोख रक्कम दुचाकी व मोबाइल असा एकुण ३ लाख ५५ हजार, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई शनिवार दि.५ आक्टोंबर रोजी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.
३ लाख ५५ हजार, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जिंतूर तालुक्यातील रायखेडा येथील शेत शिवारात स्वता:च्या आर्थिक फायदाकरीता गोलाकार बसवून तिर्रट नावाचा जुगार पत्यावर पैसे लावून खेळला जात होता याची गुप्त माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे यांच्या मार्ग दर्शनाखाली पोहेकाॅ.सूर्यकांत केजगीर, रशीद शाह, पोकाॅ. जिलानी शेख, याच्यासह ६ होमगार्ड कर्मचाऱ्यांनी शनिवार दि.५ आक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक धाड टाकली या वेळी राजु चव्हाण रा केव्हाळ ता.जिंतुर राजु राठोड रा.केव्हाळ ता.जिंतुर रामप्रसाद देवकर रा. शिवाचीवाडी ता.जिंतुर, अक्षय आढे रा. मालेगाव ता.जिंतुर, गजानन जाधव रा. सायखेडा ता.जिंतुर सोपान जाधव रा.यनोली ता.जिंतुर संजय आढे रा.यनोली ता.जिंतुर, सचिन राठोड रा.पुंगळा ता, जिंतूर, केशव उर्फ भाऊराव अंभुरे रा.जिंतूर किसन जाधव रा.जिंतूर या १० जणांना तिर्रट खेळतांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेऊन त्याच्या जवळील एका बुलेटसह पाच मोटारसायकली (Bikes)३ लाख २० हजार रूपये किंमतीच्या व तिन मोबाईल (Mobile) ३० हजार रूपये किंमतीचे व ५ हजार ५०० रूपये रोख असा एकुण ३ लाख ५५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून वरील दहा जणांविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल जिलानी शेख याच्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात कलम १२ (अ) मुंबई जुगार कायदा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.