Pandharkawada :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ ने मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी सुरु आहे. या तस्करीमध्ये पोलीस विभागातीलच काही बिभिषणाचा सहभाग आहे. आता तर चक्क जनावर ट्रान्सपोर्टींगचे काम करणार्या नागपूर येथील काही व्यवसायीकांनी चक्क पांढरकवडा पोलीस स्टेशनला (Police station)येवुन तक्रार दिल्याने जनावर (animal) तस्करांची वाहने तेलंगणामध्ये पास करुन देणार्यांची नावे पुन्हा एकदा उजागर झाली आहे.
आरोपीमध्ये पांढरकवडा येथील तत्कालीन पोलीसाचा समावेश
पोलिसांनी नागपूर येथील व्यवसायीक मेहबुब खान गफुर खान कुरेशी (५०) रा. शिवनगर नागपूर यांच्या फिर्यादी वरुन तंब्बल ११ जणांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले आहे. संदिप मुप्पीडवार रा. अदिलाबाद, रफीक हुसैन, आकाश कुडमेथे, रिजवान उर्फ बबलु गोरी, शक्ती कनाके रा. सर्व पाटणबोरी, जाकीर पोसवाल, आमीर उर्फ भुर्या, वसीम कुरेशी, शेख अझहरुद्दीन उर्फ अज्जु रा. सर्व पांढरकवडा, गणेश आसोले रा. घाटंजी, शकील रा. पारवा या अकरा जणांवर कलम ३०८ (२), ३०८ (३), ३ (५) बिएनएस अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील संदिप मुप्पीडवार हा काही वर्षाआधी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये वाहतूक पोलीस म्हणुन कार्यरत होता. त्याचा जनावरांच्या तस्करीमध्ये थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले होते. त्यानंतर तो जिल्ह्यातील अनेक पो. स्टे. मध्ये कार्यरत असतांना सुध्दा तो राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक ४४ वर आपले जनावर तस्करीचे नेटवर्क चालवित होता.
आरोपींनी संगणमत करुन एका वाहनाचे ४ हजार रुपये दर केले
मागील काही महिण्याअगोदर जनावर तस्करीमध्येच त्याच्यावर तेलंगणा राज्यात सुध्दा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. संदिप प्रमाणे पोलीस विभागातील आणखी कोणते अधिकारी, कर्मचारी तर या जनावर तस्करीमध्ये सहभागी नाही ना?. याचा सखोल तपास पोलीसांनी करण्याची आवशक्ता आहे. यातील फिर्यादीला वरील आरोपींनी हायवेने जनावरांची वाहने सुखरुपपणे तेलंगणामध्ये पास करुन देण्याकरीता २ हजार रुपये प्रति वाहनाची मागणी केली होती. जानेवारी ते मे २०२५ पर्यत फिर्यादीने त्यांची ती मागणी मान्य करुन रक्कम दिली. त्यानंतर आरोपींनी संगणमत करुन एका वाहनाचे ४ हजार रुपये दर केले होते. तेही फिर्यादीने मान्य करुन मागिल महिण्यापर्यत आरोपींना ऑनलाईन पध्दतीने ती रक्कम वळती केली. मात्र आता आरोपी पुन्हा प्रति वाहन रक्कम वाढवुन मागत असल्याने त्रस्त झालेल्या फिर्यादी व त्यांच्या ईतर ट्रान्सपोर्टींगच्या(transporting) सदस्यांनी ती रक्कम देण्यास नकार देवुन वरील आरोपी मागत असलेल्या खंडणी बाबत पांढरकवडा पोलीसात तक्रार दिल्याने पोलीसांनी वरील आरोपी विरुध्द गुन्हे दाखल केले आहे. सदर प्रकरणाचा तपास पिएसआय नितिन सुशिर करीत आहे




