परभणी(Parbhani):- भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या विषयी इन्स्टाग्रामवर(Instagram) अश्लील कमेंट केल्यामुळे एकजनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संतप्त ओबीसी बांधावानकडून शहरात मोर्चा काढून बाजारपेठ बंद करण्यात आली यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणी वातावरणात तणाव
मागील काही दिवसांपासुन मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरून आरोप प्रतीआरोपाचे सत्र सुरू आहे. परिणामी याची धग गावखेड्या पर्यंत पोहचली आहे यातच पाचेगाव येथील अल्पवयीन मुलाने भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या बदल इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट (obscene comments) केली. यावेळी संतप्त मुंडे प्रेमी नागरिकांनी पोलीस ठाण्यात रात्रीच्या सुमारास मोठा जमाव जमला होता यावेळी जमावाने संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा आमदार मेघना बोर्डीकर यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडून आरोपीला अटक करण्याची मागणी केली यावेळी अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलावर विविध कलमानी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी दरम्यान संतप्त मुंडे प्रेमी नागरी व सकल ओबीसी समाजबांधवानी एकत्र येत शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, यलदरी रोड, मेन चौक पोलीस ठाणे पर्यंत मोर्च्या काढून दुकान बंद करण्यात आली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरून आरोप प्रतीआरोपाचे सत्र सुरू
भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विषयी इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट केल्यामुळे जिंतूर येथील एक जनावर गुन्हा दाखल करून त्याला पाठबळ देणा-या नेत्यावर कठोर कारवाहीची मागणी भाजपाच्यावतिने सोमवार २४ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासुन मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरून आरोप प्रतीआरोपाचे सत्र सुरू आहे परिणामी याची धग गावखेड्या पर्यंत पोहचली आहे.जिंतूर तालूक्यातील अल्पवयीन मुलाने भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बदल इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट केली.सदरिल मूलासह त्याला पाठबळ देणा-या नेत्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्यावतिने करण्यात आली आहे.यासाठी भागवत दळवे, अँड.दत्तराव कदम, अशोक अंभोरे, गणेश काटकर, अँड.रामेश्वर शेवाळे, संदिप बोकन, बाळू काजळे, अजय डासाळकर, राजू सोळंके, नामदेव झिंबरे, दिलीप मगर, एकनाथ सारूक, अभय महाजन, प्रकाश शेरे, महेश नावाडे, सूदाम रोकडे, प्रल्हाद गोरे आदींनी पूढाकार घेतला.