कारंजा(Washim):- ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील लोकेशन 188 वर 29 मे रोजी पहाटे साडे 4 वाजताच्या दरम्यान समोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागील ट्रक त्याला जाऊन धडकला. त्यामुळे घडलेल्या अपघातात चालक योगेश निवृत्ती खैरनार वय 39 यांचा मृत्यू झाला. तर प्रदीपसिंग जसवंतसिंग मान वय 35 वर्ष हे गंभीर जखमी झाले.
जखमी मालक येवला येथून कांदा घेऊन ओडीसाकडे जात असताना मार्गावर अपघात
सदर प्रकरणी प्रदीपसिंग जसवंतसिंग मान यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरलेल्या एम. एच. 16 बी.सी. 8174 ट्रकच्या चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी(Rural Police) विविध कलमानुसार गुन्हा दाखल(Filed a case) केला आहे. एम. एच. 15 इ.जी. 9513 क्रमांकाच्या ट्रकने अपघातातील मृत चालक व जखमी मालक येवला येथून कांदा घेऊन ओडीसाकडे (Odisha) जात असताना मार्गातील अपघातस्थळी समोरील एम. एच. 16 बी.सी. 8174 क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाने एकदम ब्रेक(Break) दाबल्याने हा अपघात झाला. त्यात चालक योगेश खैरनार हा मरण पावला व प्रदीपसिंग जसवंतसिंग मान यांच्या मांडीला व पायाला मार लागला. या अपघातास ट्रक क्रमांक एम. एच. 16 बी.सी. 8174 चा चालक जबाबदार आहे, अशा आशयाच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी सदर ट्रक चालकाविरुद्ध भा.द.वि.च्या कलम 279 , 304 अ व 337 नुसार गुन्हा दाखल(Filed a case) केला आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस करीत आहे.