India Vs Australia:- भारत विरुद्ध ॲडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. गुलाबी चेंडूच्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने संघातील बदलांबाबत सांगितले. जोश हेजलवूड (Josh Hazlewood) दुखापतीमुळे दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्याची एक्झिट हा संघासाठी मोठा धक्का म्हणता येईल. त्याच्या जागी एका नव्या खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये इतर कोणताही बदल केलेला नाही
हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलंडचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघात इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर आहे. दुसरा सामना खूप महत्त्वाचा आहे. बोलंड आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून खेळणार हे निश्चित आहे. याआधीही तो ऑस्ट्रेलियन संघाकडून कसोटी क्रिकेट खेळला आहे. मात्र, गेल्या 18 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली आहे. 10 कसोटीत 35 बळी घेण्यात तो यशस्वी ठरला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ:
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.