परभणी/सोनपेठ(Parbhani):- हात उसने दिलेल्या दोन हजार रुपयांची मागणी केल्यावर याचा राग आल्याने दोन महिलांनी मिळुन एका महिलेस तीचे डोके सिमेंट रस्त्यावर आपटुन तीचा जीव घेतला. हि घटना मंगळवार २ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे घडली. या प्रकरणी आरोपी दोन महिलांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
रेखा विष्णु लोखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. अंतीकाबाई लोखंडे यांनी तक्रार (complaint)दिली आहे. दोन महिण्यांपुर्वी फिर्यादीचा नातु गणेश लोखंडे याला महाकाली उर्फ त्रिवेणी घुंबरे हिचा नवरा राहुल घुंबरे याने दोन हजार रुपये उसणे मागीतले होते. संबधीताला रक्कम देण्यात आली.
हि रक्कम तो परत देत नव्हता. याबाबत फिर्यादीचा नातु गणेश ने फिर्यादीची सुन रेखा हिला माहिती दिली. रेखा ने चार दिवसांपुर्वी पैशांची मागणी केली होती. यावेळी तीला शिवीगाळ(abusing) करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मंगळवारी फिर्यादीची सुन रेखा लोखंडे सकाळच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा विष्णु याला जेवणाचा डब्बा देवून परत येत होती.
राग मनात धरत छातीवर बसुन डोके जोर जोराने सिमेंट रोडवर आपटले
यावेळी सार्वजनिक रस्त्यावर महाकाली उर्फ त्रिवेणी घुंबरे, तीची बहिण मनकर्णा नवनाथ रणखांबे या दोघी रेखाला भेटल्या असता रेखाने दोन हजारांची मागणी केली. याचा राग मनात धरत महाकाली उर्फ त्रिवेणी हिने रेखाच्या छातीवर बसुन तीचे डोके जोर जोराने सिमेंट रोडवर आपटले. यावेळी मनकर्णा हिने रेखाचे पाय दाबुन धरले. भांडणाचा आवाज ऐकुण फिर्यादी बाहेर आली असता. त्यांना देखील मारहाण (beating) करत ढकलुन देण्यात आले. मारहाणी नंतर दोन्ही महिला पळुन गेल्या. रेखा रस्त्यावर पडुन होत्या. डॉक्टरांना (Doctors)बोलावून तपासणी केल्यावर त्यांनी रेखाचा जीव गेल्याचे सांगीतले. याप्रकरणी महाकाली उर्फ त्रिवेणी राहुल घुंबरे, मनकर्णा नवनाथ रणखांबे यांच्यावर सोनपेठ पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.