मानोरा (Washim):- बहुजन व बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पाेहरादेवी येथील नंगारा सांस्कृतीक भवन लाेकार्पण साेहळा उदघाटन भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या शुभ हस्ते दि. २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती राहणार
या करिता नियाेजन सभा यवतमाळ (Yawatmal)येथे पार पडली. या सभेला पालकमंत्री ना. संजय राठाेड यांनी मार्गदर्शन केले. तसेच लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या पार पडलेल्या सभेकरिता वाशिम व यवतमाळ जिल्हयातील बंजारा समाजातील सामाजिक, राजकिय कार्यकर्ते व बंजारा समाज बाधव बहसंख्येंने उपस्थित हाेते.