कळमनुरी(hingoli):- कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा शिवारात एका शेतकऱ्याचा मृतदेह (Deadbody) आढळून आल्याची घटना ३ जुन सोमवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.
काही तरुण त्या भागात आले असतांना त्यांना एका शेतकऱ्याचा मृतदेह रस्त्यालगत शेतात आढळून आला
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील शिवणी येथील शेतकरी नामदेव मिरासे यांचे गावापासून काही अंतरावर असलेल्या मसोडफाटा शिवारात शेत आहे. सध्या शेतात खरीप हंगामाच्या मशातगतीची कामे सुरू आहेत. रविवारी रात्रीच्या वेळी नामदेव मिरासे हे त्यांच्या शेतात गेले होते. दरम्यान, आज सकाळीच्या सुमारास काही तरुण व्यायामासाठी(exercise) या भागात आले असतांना त्यांना एका शेतकऱ्याचा मृतदेह रस्त्यालगत शेतात आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने कळमनुरी पोलिसांना कळवली. कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक(Sub-Inspector) गजानन कांगणे, जमादार माधव भडके, देविदास सुर्यवंशी, माधव डोखळे, शकुराव बेले, रामा शेळके शिवाजी देमगुंडे यांच्यासह पोलिस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली त्यानंतर सदर मृतदेह शिवणी येथील नामदेव मिरासे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नामदेव मिरासे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान नामदेव मिरासे यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही कळु शकले नाही.