परभणी/जिंतूर (Parbhani) :- बसमध्ये चढत असताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील वीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे डोरले, मणी लंपास करण्यात आल्याची घटना २९ जुलै रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जिंतूर बसस्थानकात(bus station) घडली. या प्रकरणी मंगळवार ३० जुलै रोजी अनोळखी चोरट्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात(Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकलाबाई घुगे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या पतीसोबत जिंतूर ते वाई जाण्यासाठी वालूर बसने प्रवास करत होत्या. अकोली पाटीच्या पुढे गाडी आल्यावर त्यांना गळ्यातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती फोनवर मुलाला दिली. जिंतूर येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अनोळखी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याची तक्रार देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.