परभणी (Parbhani) :- येथील रेल्वे स्थानकावर (Railway station) छत्रपती संभाजीनगर रेल्वे कॅम्प कॉर्टाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत १३६ आरोपींकडून १ लाख ३६ हजार २०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
रेल्वे लाईन धोकादायक पध्दतीने ओलांडणे, नो-पार्विंâग, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते व इतर रेल्वे नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तीविरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.मोताळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी आरपीएफ विभागाचे निरिक्षक एस.बी.कांबळे, मोगरे, अविनाश पाटील, शिवानंद मंठे, आरती वटाणे, व्ही.पी.सिंघ, मुक्ता भिसे, गायकवाड, प्रशांत गवळे, राम फरकड, गंडे, स्वप्नील पवार, कुलकर्णी, खिल्लारे, दिपक कुमार यांनी सहकार्य केले.