चिखली (Buldhana) :- झटपट पैसे कमवण्याच्या नादात चोर आणि सराईत गुन्हेगार वाट्टेल त्या थराला जात आहेत. त्यात अगदी जीवघेणे कृत्य करण्यासही ते तत्पर असतात.काही प्रमाणात त्यांना अतिअल्प यशही येतं, मात्र पोलिसांच्या नजरेतून या गुन्हेगारांची क्वचितच सुटका होत असल्याने जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचे चांगलेच मनोबल वाढले आहे. त्यामुळे अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील घरासमोरून चक्क चोरटयांनी एका ट्रॅक्टरसह मोटार सायकलही लंपास केली. अशा घटनेवरुन पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजीच्या रात्री १० वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला होता. परंतु रात्रीच ठाणेदार यांनी तपास चक्रे फिरवून तीन तरुण आरोपींना टेभूर्णी येथे जावून अटक केली आहे.
तीन तरुण आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
सविस्तर असे की आज रोजी शेतकरी कुंटूब शेतीच्या मग्न असल्याने दररोज १२ ते ४ वाजेपर्यंत सर्व शेतात कामासाठी जातात. याच्याच गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा गावात घराच्या आजुबाजूला कोणी नसल्याचे पाहून चोऱ्याचे सत्र चालविले आहे. त्यांमध्ये पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गांगलगाव येथील गजानन हरिभाऊ म्हस्के वय ४८ वर्ष त्यांचे रोहडा शेत शिवारात गट न. २५९,२६० मध्ये ५ एकर जमीन आहे या शेतीच्या कामासाठी त्यांनी स्वराज कंपनीचे ७४२ एक्स टी लाल रंगाचे ट्रॅक्टर (tractor) क्रमांक एम एच २८ बी डबल्यू १५१० हा सन २०२३ मध्ये सचिन ट्रॅक्टर शोरुम, चिखली येथुन ७ लाख १० हजार रुपयामध्ये विकत घेतला होता आणि एका महिन्यापासुन गावातीलच मधुकर रामकृष्ण म्हस्के यांचे घरासमोर उभे करूण ठेवत होते. दिनांक २ ऑगस्ट रोजी शेतात खत टाकण्यासाठी ट्रॅक्टर शेतात नेले आणि काम आटोपल्या नंतर सायंकाळी नेहमी प्रमाणे मधुकर रामकृष्ण म्हस्के यांचे घरासमोर उभा करूण दिला होता.
घरासमोरून ट्रॅक्टर चोरी
परंतु दि ४ ऑगस्ट रोजीच्या २ वाजेपासून मधुकर रामकृष्ण म्हस्के यांच्या घरासमोरून ट्रॅक्टर गायब झाला. त्याच बरोबर गावातीलच अनिल नागोराव आराख यांची हिरो कंपनीची पॅशनप्रो निळ्या रंगाची मोटारसायकल (Motorcycle) क्रमांक एम एच २८ बी यु ८०९४ रूपये ३५ हजार ही सुध्दा चोरट्यांनी चोरून नेली आहे. अशा तक्रारी वरुण अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी अज्ञात चोरट्या विरुध्द कलम ३०३ (२) भादवी नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच रात्रीच ठाणेदार विकास पाटील यांनी आपली गुपीत चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना टेभूर्णी जि. जालना (Jalna) येथून ट्रॅक्टर व मोटार सायकल सह अटक केले. त्यामुळे गजानन हरिभाऊ म्हस्के वय ४८ वर्ष यांच्या तक्रारी वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी आरोपी शिवाजी काळे, वैभव म्हस्के, अमोल गाडेकर सर्व राहणार गांगलगाव यांना ताब्यात घेवून आणखी किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत याची कसून चौकशी सुरू आहे असे ठाणेदार विकास पाटील यांनी दै देशोन्नती (Deshonnati) शी सांगण्यात आले .