Nagpur :- महाराष्ट्रातील नागपूर शहरात गॅस सिलिंडर (Gas cylinder) गॅस चोरी करणाऱ्या टोळीला पकडले. ते गॅस सिलिंडरमधून 3-4 किलो गॅस चोरून ग्राहकांना विकायचे, टोळीतील 1 सदस्य सध्या अटकेत आहे.
तुमच्या घरातील गॅस सिलेंडर लवकर संपत असेल तर काळजी घ्या..!
तुमच्या गॅस सिलेंडरमध्ये दिलेला गॅस आधीच चोरीला गेला असण्याची शक्यता आहे. मानवसेवा नगर येथील नागरिकांनी एका टोळीला पकडले आहे. जो गॅस एजन्सीमधून तुमच्या घरी पुरवलेल्या सिलिंडरमधून गॅस चोरी करायचा आणि विकायचा त्याच टोळीला नागरिकांनी पकडले. हे सदस्य खासगी गॅस एजन्सीमध्ये (Gas Agency) काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्यक्ती ज्या सिलिंडर एजन्सीच्या सिलिंडरमधून गॅस चोरून ग्राहकांच्या घरी गॅस सिलिंडर पोहोचवायचा त्याचा कोणालाही संशय सुद्धा येत नव्हता. सर्व नागरिकांसोबत तो नेहमी मिळून मिसळून राहायचा. पण तोच व्यक्ती सर्वांसोबत असा करेल याबद्दल कोणाला कळले नाही, याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे. तसेच कारवाई केल्यांनतर टोळीला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास गिट्टीखदान पोलिस विभागाकडून सुरू आहे.