चिखली (Buldhana) :- तालुक्यातील मेरा बु येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये सन 1988 च्या वर्षी वर्ग दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेल्या वर्ग मित्रांनी दिवाळी सनाचे औचित्य साधून गेट टू गेदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल 36 वर्षांनी सर्व वर्गमित्रांचा एकत्र भेटण्याचा योग आल्याने सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
36 वर्षांनी सर्व वर्गमित्रांचा एकत्र भेटण्याचा योग आल्याने सर्वांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा
चिखली तालुक्यातील मेरा बु येथे एकमेव पाचवी ते बारावी पर्यत श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा देऊन 1988 साली या शाळेतून पुढील शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ही शाळा सोडली होती. पुढील शिक्षण , नोकरी, धंदा, व्यवसाय या निमित्ताने एकमेकांपासून दूर गेले होते. परत एकदा आपण याच शाळेमध्ये एकत्र भेटावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय इंगळे सर होते. ज्या वर्ग खोलीमध्ये इयत्ता दहावीची बॅच शिक्षण घेत होती त्याच खोलीमध्ये आपण आपल्या जागेवर बसून विद्यार्थी (Students) म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम शालेय जीवनामध्ये जे शिक्षक शिकवित त्यापैकी काही शिक्षकांनी या जगाचा निरोप घेतला अशा दिवंगत शिक्षकांना “श्रद्धांजली” (Tribute) अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर सोबतच शिक्षण घेत असताना काही कालावधीनंतर तब्बल आठ वर्ग मित्रांनी या जगाचा निरोप घेतला त्यांनासुद्धा श्रद्धांजली ,आदरांजली सामुहिक अर्पण करण्यात आली.
त्याच बाकड्यावर बसून सर्वजण शालेय जीवनातील भूतकाळातील विद्यार्थी जीवनाचा आनंद घेतला
क्रमवारी एकमेकांचा परिचय व सध्या काय करत आहे, अपत्य किती? ते काय करतात?व शालेय जीवनातील, संसारातील काही गमतीदार, मजेदार किस्से सांगत परीचय दिला. या कार्यक्रमांमध्ये काही ठराव पारित करण्यात आले त्यामध्ये यापुढे सर्व वर्ग मित्रांनी एकमेकांच्या सुख, दुःखात सहभागी व्हायचे, अडीअडचणीच्या वेळेस काही मित्रांना गरज पडल्यास आर्थिक मदत करायची, दरवर्षी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांनी एकत्र येऊन सहभोजन करायचे, एकमेकांच्या ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात राहायचे, एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक जण आपल्याला मिळालेल्या परिस्थितीशी तडजोड करत समाधानी दिसले. अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापक इंगळे सर यांनी मनोगत व्यक्त केले. ज्या वर्गामध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकलो त्याच वर्गामध्ये आज ३६ वर्षांनी एकत्र त्याच बाकड्यावर बसून सर्वजण शालेय जीवनातील भूतकाळातील विद्यार्थी जीवनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनिल अंभोरे तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सत्यजित ठोसरे यांनी केले.