कोरेगाव(Gadchiroli):- देसाईगंज तालुक्यातील शेतकरी धान पिक लावनी पासूनच त्रस्त आहेत कधी लोडसेंडी मुळे तर कधी जंगली जनावरान मुळे ओडीसा राज्यातून आलेल्या हत्ती कळपाने(Herd of elephants) देसाईगंज तालुक्यात व आरमोरी तालुक्यात ठान मांडुन आहेत वनविभाग (Forest Department) व हत्ती हुल्ला ठिम काहीही करुसकत नाही काही दिवसांपूर्वी रवी परीसरात हत्ती गेल्याने तालुक्यातील पिंपळगाव ,डोंगरगाव, अरततोंडी, विहीरगाव परिसरातील शेतकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.
आता ऐन धानपिक कापनीच्या वेळी हत्ती परतल्यानंतर धान पिकाची नासधूस करीत आहेत दोन दिवसांपूर्वी अरतोंडी येथील नितीन बुद्धे यांच्या शेतात व शेजारच्या शेतात रात्रीच्या वेळी धान पिकाची नासधुस केल्याने शेतकरी (Farmer) हतबल झाले आहेत. वनविभाग हत्ती रोखण्यासाठी असमर्थ असल्याने शेतकर्यांत असंतोष (Dissatisfaction) निर्माण झाला आहे.